
कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सुळे येथील पुनद नदीच्या तीरी श्री. सिध्देश्वर तिर्थक्षेत्र महादेव मंदिर हे सतराव्या शतकातील असून त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. यावेळी भाविक भक्त यानी मंदिरांमध्ये हजेरी लावत होते. ह्या ठिकाणी हरिपाट व भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले व देखील यावेळी शिवलिंगाची दूध, पाण्याने स्नान करण्यात आले. व हळद, कुंकू बेलपत्री वाहून महाआरती पूजा केली. या ठिकाणी मोठे असे एक पाण्याचे कुंड आहे. यात वर्षभर पाणी भरलेले असते डोंगर चहुबाजूने झाडाझुडपाने वेडलेला आहे. व या डोंगराच्या खुशीत सुळे हे गाव वसलेला आहे आणि त्या गावालगत देखील श्री. शिवलिंग तीर्थक्षत्र आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी नेहमी सालाबादा प्रमाणे महाशिवरात्री निमित्त आज सुळे येथील. सिध्देश्वर मंदिरात भाविकांना आज प्रत्यक्ष महादेवांच्या दर्शनाचा आनंद मिळाला. सुळे येथील श्री. क्षेत्र सिध्देश्वर मंदीरात महाशिवरात्री निमित्ताने दर्शनासाठी आलेले कळवण, सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार यांनी देखील घेतले शिवलिंग तीर्थक्षत्र यांचे दर्शन व परिसरातील व पंचक्रोशीतील सर्व भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी झाली होती. यात देखील भाविकांनी नेमाचे पालन करुन घेतले दर्शन व महाशिवरात्रीच्या यात्रे निमित्ताने सकाळपासून गावातील नागरिकांन कडून महाप्रसाद साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी अभोणा पोलिस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी गावातील पोलीस पाटील पांडूरंग गांगुर्डे, पोपट बागुल, सोमनाथ भोये, भासीलाल गांगुर्डे, संजय गांगुर्डे, पंडित गांगुर्डे,गुलाब ठाकरे, वंसत पवार यासह गावातील ग्रामस्थानी व भाविकांनी देखील मोलाचे सहकार्य केले.