
सिन्नर – शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या एका वीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली.ज्ञानेश्वर भागवत काळे हा रा. शेगाव जिल्हा -बुलढाणा हल्ली मुक्काम यशवंत नगर ,सिन्नर .असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्या राहत्या घरात कमरेच्या बेल्टच्या सहाय्याने छताच्या हुकला गळफास घेऊन आपले जीवन संपविले .घरातील कुटुंबीयांनी ते बघितले असता त्याला तात्काळ फासावरून खाली घेतले व ताबडतोब ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पुढील तपास हवालदार गोसावी हे करत आहेत.