
सिन्नर – परप्रांतीयाच्या आपसीवादातुन एकाने दुसऱ्याच्या दहा वर्षीय मुलाचा निर्घुणपणे खून करून,त्याचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दीला. रमेश सहा असे खुन करणाऱ्या संशयिकाचे नाव आहे. व अभिषेक अच्छेलाल सहा (१०) असे मृत मुलाचे नाव आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित रमेश सहा व मयत मुलाचे वडील अच्छेलाल सहा हे एकमेकाचे नातेवाईक असून ते मूळ बिहारचे राहणारे आहेत व ते सध्या भगवती स्टील लि.सिन्नर येथे कामाला आहेत. तर दोन महिन्यापूर्वी या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादाचा राग संशयित रमेश यांच्या मनामध्ये होता. वाद झाल्यानंतर तो लगेच बिहार येथे गेला होता. व दोन महिन्यानंतर तो सिन्नर येथे परत आला . व गुरुवार (१०) रोजी त्याने अच्छेलाल याचा मुलगा अभिषेक (१०) याचा खून केला, व त्याचा मृतदेह खंडेराव मंदिर जवळ झाडाझुडपात फेकून दिला होता. अभिषेकचा एक हात तोडलेला व पोटावर चाकूने वार केलेले होते. मृत अभीषेख यांंच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने निफाड विभागाचे पोलीस उप अधीक्षक डॉक्टर निलेश पालवे, निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भगवान शिंदे , योगेश शिंदे , प्रकाश उंबरकर , प्रशांत सहाने ,आदींचे पथक शोध घेत होते. दरम्यान पोलिसांना खंडेराव मंदिराच्या मागे झुडपात एक मृतदेह पडलेला असल्याचे कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व गुन्हाची उकल करीत पोलिसांनी संशयीतास माळेगाव येथून अटक केली. पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर यांच्यासह पथक घटनेचा तपास करीत आहेत.