ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक मध्ये हेलिपॅड वर उतरताच पोलिसांकडून त्यांच्या बॅगांची तपासणी.

नाशिक प्रतिनिधी

नाशिक-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत, दरम्यान एकनाथ शिंदे यांचा हेलिकॉप्टर नाशिक हेलीपॅड वर पोहोचतात पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. एकनाथ शिंदे बॅगांमधून पैसे घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना प्रतिउत्तर देत आम्ही आताही बॅग घेऊन आल्याचे म्हटले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुरडा उडत असतांना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे वर गंभीर आरोप केले होते, एकनाथ शिंदे यांनी नाशिक मध्ये येताना आपल्या सोबत पैशांनी भरलेल्या बॅगा आणण्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांनी शेअर केलेला व्हिडिओ नाशिक मधील होता. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर मधून उतरतांना दिसत होते.

हा व्हिडिओ पोस्ट करतांना संजय राऊतांनी लिहिलं होतं की, नाशिक मध्ये “रात्रीस खेळ चाले नुसता पै पाऊस” दोन तासाच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बँगा पोलीस वाहत आहेत? यातून कोणता माल नासिकला पोहोचला ?निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या घेत आहेत ?महाराष्ट्रात अधिकृत बॅगावाटप सुरू आहे. एकनाथ शिंदे आजही नाशिक मध्ये असून याच आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बॅगाची तपासणी करण्यात आली आहे .एकनाथ शिंदे नाशिक मध्ये हेलीपॅड वर दाखल झाल्यानंतर सर्वांसमोर त्यांच्या बॅगा उघडून तपासणी करण्यात आल्याने अनेकांच्या भुवाया उंचावल्या होत्या. एकनाथ शिंदे यांना जे व्हा पत्रकारांनी संजय रावतांनी बॅगासंबंधी केलेल्या आरोप बद्दल विचारणा केली असता त्यांनी, आम्ही आताही बॅगा घेऊन आलो आहोत, असं सांगत त्यांनी पत्रकारांसोबत जास्त बोलण्यास नकार दिला.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.