ताज्या घडामोडी
नांदगाव जवळील म्हसोबा बारीमध्ये अल्टो कार आणि मनमाड आगाराची एसटी महामंडळाची बस यांच्यात भीषण अपघात
ज्ञानेश्वर पोटे

नांदगाव- येथे गंगाधरी गावाजवळ म्हसोबाबारीमध्ये सकाळी 11वाजेच्या दरम्यान चाळीसगाव हून मनमाड कडे येणारी मनमाड आगाराची बस क्रमांक एम एच 14 बी टी 4498 व भगूर (नाशिक)येथून भडगाव पाचोर्याकडे जाणारी अल्टो कार क्रमांक एम एच 15 सीडी 2057 यांच्यात समोरासमोर अपघात होऊन कारमधील दोन महिलांसह एक पुरुषाचा मृत्यू झाला आहे व कार मधील दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले असून त्यास अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.या अपघाताचे वृत्त समजताच आमदार श्री. सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले.एस टी महामंडळाच्या वाढत्या अपघातांबाबत शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारच्या मागण्या घटनास्थळावरील नागरिक करत होते.