
माळेगाव एमआयडीसी मधील स्वस्तिक पल्स अँड पेपर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यांमध्ये काम करत असताना एका परप्रांतीय कामगारांची मिक्सर मशीन मध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे कंपनीमध्ये कामगारांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे. लखिराम मिलिंदा मुर्म (19) असे मृत कामगाराचे नाव असून तो पश्चिम बंगाल येथून त्याचे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तो या वयामध्ये त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी येथे काम करत होता. परंतु त्याने विचार सुद्धा न करण्यासारखे त्याच्यासोबत घडले. लखीराम हा दुपारच्या सुमारास कारखान्यातील लद्दा मशीनवर काम करत असताना तो बेल्टवर पडला त्यामुळे तो थेट मिक्सर मशीन मध्ये जाऊन पडला व त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार श्री टेमघर हे करत आहेत.