बहुउद्देशीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा जिल्हास्तरीय पत्रकार मेळावा व पदाधिकारी प्रवेश सोहळा संपन्न
ज्ञानेश्वर पोटे

हॉटेल वैभवी चांदोरी ता. निफाड जिल्हा नाशिक येथे रविवार दिनांक.११.२.२०२४रोजी सकाळी ११ वाजता झाला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष जी निकम सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश संपर्क प्रमुख श्री..सोमनाथ मानकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे, नाशिक जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक संतोष सोनवणे सर, शहर जिल्हाध्यक्ष योगेश घोलप,पोलीस टाईम्स न्यूज चॅनेल 24×7 चे मुख्य संपादक श्री.राहुलजी(केदू )वैराळ सर व सर्व वरीष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्ती व पत्रकार चर्चासत्राचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नाशिक जिल्हा संघटक संतोष आढाव सर, भ्रष्टाचार निर्मूलन संघ नाशिक जिल्हा सदस्य गणेश मोगल सर व बहुउद्देशीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ निफाड तालुका व नाशिक जिल्हा सर्व पदाधिकारी व सभासद यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.