
जिल्हा माहिती कार्यालय नाशिक यांच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वसाधारण वृत्तपत्रांची पारंपारिक माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असला तरीही लोककला आणि पथनाट्यांद्वारे शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम लोककला असल्यामुळे शासकीय योजना आणि योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे अनुभव हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामीण भागात अनुसूचित जाती उपाययोजना( विशेष घटक योजना) अंतर्गत सन २०२३/२४ लोककला व पथनाट्याद्वारे कार्यक्रम करण्यासाठी आनंदतरंग फाउंडेशन वाघेरे-नासिक या संस्थेस मान्यता देण्यात आली असून नाशिक व सिन्नर तालुक्यातील गावांमध्ये “लोकरंजनातून लोकशिक्षण” लोककलेच्या माध्यमातून शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी हे करणार असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील तालुका निहाय अनुसूचित जाती असलेल्या ग्रामीण भागातील वंजारवाडी, लोहशिंगवे, लहवीत, शेवगेदारणा , भगुर , पांढुर्ली , बोरखिंड , घोरवड , शिवडे आदी ठिकाणी भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो पुणे व महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क मंत्रालय मुंबई मान्यताप्राप्त तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड नोंद असलेले व मा. राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित आनंदतरंग कलापथकाचे शाहीर उत्तम गायकर यांचे समवेत शंकरराव दाभाडे , शिवाजी गायकर ,देविदास साळवे ,नामदेव गणाचार्य, दुर्गेश गायकर, रामकृष्ण मांडे, ओंकार गायकर, दीपक साळवे , दादाराव घाटे,सुप्रसिद्ध व्याख्याते समाधान हेंगडे पाटील जनजागृती करत आहेत.