तीव्र पाणी टंचाई अभावी जंगलातील हरणावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला…प्राणघातक हल्ल्यात हरणाचा मृत्यू
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव– मौजे वडगाव पंगु तालुका चांदवड येथे 24 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6:45 वाजता ही घटना घडली.तिव्र पाणी टंचाई अभावी हरीण जंगल सोडून मानवी वस्तीकडे पाण्यासाठी भटकत असताना त्याच्या पाठीमागे पाच मोकाट कुत्रे लागले होते,वडगाव पंगु येथील शेतकरी मारुती आनंदा गोजरे यांना गट नंबर 82 /2/2 मध्ये हरणाच्या पाठीमागे पाच कुत्रे लागलेली दिसली त्यावेळेस एक हरीण बेशुद्ध पडलेले दिसले व मारुती आनंदा गोजरे यांनी त्या मोकट कुत्र्यांना उसकावून लावले. हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवले व घरापासून 200 फूट अंतरावरून पाणी घेऊन त्या हरणाला पाणी पाजले व त्यांनी वन्य प्राणी मित्र समाजसेवक भागवत झाल्टे यांना फोनवरती माहिती दिली झाल्टे यांनी वन मजुर भाऊसाहेब झाल्टे यांना माहिती दिली व ते स्वतःही व वडगाव येथील पोलीस पाटील सागर पवार व तंटामुक्ती अध्यक्ष यांना ही त्या ठिकाणी बोलावुन घेतले व चांदवड तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धोंडे सरांनां ही हरिणाच्या उपचारासाठी भागवत झाल्टे यांनी फोनवरती संपर्क केला पण, अर्ध्या तासातच हरणाचा मृत्यू झाला. हरीण हे थोड्याच दिवसात पिल्लं देण्याच्या स्थितीत होते हरीण हे गरोदर असल्याचा अंदाज आहे.
वन परिसरातील पानवटे संपूर्ण वनविभागाच्या हलगर्जीपणा पणा मुळे कोरडे झाले आहे याची सविस्तर माहिती वन्य पशू प्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी वारंवार वन विभागाला देऊनही वन विभाग याची दखल घेत नाही.याला स्थानिक वनविभागाच्या अधिकारी जबाबदार आहे.त्या वरीष्ठानां या बाबतची वस्तू स्थिती सांगता नाहीत, त्यामुळे येथील वनरक्षकांची लवकरात लवकर बदली न झाल्यास परिसरातील वडगाव पंगु, रापली,कातरवाडी, नगरचौकी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी यांच्याकडे मोठ्या संख्येने जाणार आहे.वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे अजुन कीती जंगली मुक्या प्राण्यांचे जीव घेणार, शासन त्यांच्यावर काय कारवाई करणार,अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.लवकरात लवकर पाणवठ्यांवर पाणी टाकावे अशी मागणी वन्यप्राणी पशु मित्र श्री भागवत झाल्टे यांनी वनविभागला वारंवार करुनही वनविभाग अजून किती जंगली प्राण्यांचा जीव घेणार अशी विचारणा स्थानिकां कडून होत आहे .हरीण मारुती आनंदा गोजरे यांच्या वस्तीवरच आहे त्याच्या मुत्य देह्याचे रक्षण वन मजुर भाऊसाहेब झाल्टे करत आहे. 25/04/2024 रोजी डॉक्टर त्याचा पंचनामा करतील अशी सविस्तर माहिती वन्य पशु प्राणि मित्र भागवत झाल्टे यांनी दिली आहे.