गुजरात मधील सोनगड पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात तडजोड करणे कामी नवापूर पोलीस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्याने मागितली लाच
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव– नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी गुजरात मधील सोनगड पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये तडजोड करणे कामी तक्रारदार यांच्याकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली, याबाबत सविस्तर माहिती अशी यातील तक्रारदार यांचेवर सोनगड पोलीस स्टेशन, जिल्हा तापी, राज्य – गुजरात येथे गुन्हा रजिस्टर नंबर 583/2023 प्रमाणे प्रोव्हीबिशन चा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचे तपासकामी (एल. सी. बी. तापी, गुजरात राज्य) पोलीसांचे पथक नवापूर पोलीस स्टेशन, जिल्हा नंदुरबार येथे आले त्यावेळी नवापूर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर वारे यांनी सोनगड पोलीस स्टेशन, जिल्हा तापी राज्य गुजरात चे गुन्ह्यामध्ये मध्यस्थी करून अटकेपासून बचाव होणेकामी मदत केल्याचे मोबदल्यात त्यांनी तक्रारदार यांचे मित्र यांच्याकडे तक्रारदार यांच्यामार्फत 2,50,000/- रुपये लाचेची ची मागणी केली होती.त्यावेळी तक्रारदार यांनी भीतीपोटी दि 05/03/2024 रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना 1,00,000/- रुपये लाच म्हणून दिले होते त्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी 1,50,000/- रुपये अधिक लाचेची मागणी करून दिनांक 24/04/2024 रोजी लाचेची मागणी पडताळणी दरम्यान तडजोड अंति 50,000/- रुपये लाचेची ची मागणी करून पंचा समक्ष मागणी केलेली लाचेची रक्कम 50,000/- रुपये स्वीकारले आहे. त्यांचेवर नवापूर पोलीस स्टेशन, जिल्हा नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाम चालू आहे.