
🔴 उत्सव आई सप्तश्रृंगीचा
उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता, स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तश्रृंगी गडावर आदिमाया सप्तश्रृंगी देवीचा चैत्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला असून मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी जात आहे.
श्री. आविष्कारजी अनिता दादाजी भुसे व मित्र परिवारातर्फे पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मानूर रोड, कळवण येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाचा दिवस – रात्र हजारोंच्या संख्येने भाविक अस्वाद घेत आहेत.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने खानदेशातील जळगाव, भुसावळ, शिरपूर, धुळे, पारोळा, चाळीसगाव, जामनेर आदी भागातील भाविक डिजेच्या तालावर नाचत गात वणी गडाकडे मार्गस्थ होत आहेत.