ताज्या घडामोडी
नाशिक : उन्हामुळे दुपारी दोन ते चार यावेळेस सिग्नल बंद, मात्र मोठ्या चौकातील सिग्नल सुरू
नासिक प्रतिनिधी

नासिक – शहरातील तापमान 40°c पर्यंत जात असल्यामुळे सकाळपासूनच उन्हाच्या झळा बसतात, त्यामुळे सिग्नल लागल्यावर तो सुटेपर्यंत वाहन चालकांना विशेष म्हणजे दुचाकी स्वारांना उन्हाच्या झळा खात उभे राहावे लागू नये यासाठी शहरातील सर्व सिग्नल सह महामार्गावरीलही सिग्नल दुपारी दोन ते चार या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. उन्हापासून काही काळ का होईना वाहनधारकांना दिलासा मिळावा, यासाठी दुपारच्या वेळेस शहरातील विविध भागातील सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेच्या वतीने घेण्यात आला आहे. वाहतूक सुरक्षिततेच्या वतीने द्वारका सीबीएस यासारखे जास्त रहदारी असलेले सिग्नल मात्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. आणि कमी रहदारीच्या /वरदडीच्या ठिकाणावरील सिग्नल वर वाहनधारकांना सूट मिळणार आहे..