सप्तशृंगी गड शिवालय तलाव परिसरामध्ये चोरांचा सुळसुळाट भाविकांचे पैसे व मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले
सोमनाथ मानकर

सप्तशृंगी गड
साडेतीन शक्तीपीठापैकी अध्यापिठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी सुरू झालेल्या चैत्र उत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पाई पाई लाखोच्या संख्येने गडावर दाखल झालेले आहे सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने शिवालय तलाव परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी अतिशय उत्तम व्यवस्था केलेली असून या ठिकाणी भजन कीर्तन हरिपाठ भागवत कथा असे अनेक प्रकारचे आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम सुरू असून यामध्ये भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत आहे
भाविकांना राहण्यासाठी सुख सुविधा अतिशय उत्तम असल्यामुळे या ठिकाणी भाविक राहतात परंतु ज्या मंडप डेकोरेशन वाल्याला लाईट लावण्याचे काम दिलेले आहे त्या डेकोरेशन वाल्याने राहण्याचे ठिकाणच्या व्यतिरिक्त बाहेर कुठे लाईट लावलेले नसल्यामुळे येणाऱ्या भाविकांना अंधारात चाचपडत झोपावे लागत आहे व याचं अंधाराचा फायदा हे भुरटे चोर घेत आहेत त्यामुळे या ठिकाणी चोरीचे प्रमाण खूप वाढलेले आहे भाविकांना अक्षरशा घरी जाण्यासाठी भाड्याला पैसे नसून हॉटेलमध्ये कुठल्या प्रकारे जेवण करण्यासाठी सुद्धा पैसे नाही त्यामुळे भावीक अक्षरशः मेटाकुटील आहे तसेच कोणाकडे ऑनलाइन पैसे मागावे तर नेटवर्क नाही त्यामुळे पैसे मागता येत नाही आणि कुठल्या प्रसादही घेता येत नाही त्यामुळे भावीक अक्षरशा संताप व्यक्त करत आहे
चैत्र उत्सव सुरू होऊन आज पाच दिवस होऊन सुद्धा शिवालय तलाव परिसरामध्ये ज्या ठिकाणी भावीक राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी कुठल्याही बाजूला लाईटची व्यवस्था न केल्यामुळे चोरांचं स्वागत आहे कारण भाविक साक्री धुळा अमळनेर अशा अनेक गावामधुन भाविक पाईपाई गडावर आल्यामुळे भाविकांना अक्षरशा कुठे झोपावे हे कळत नाही त्यामुळे पडल्याबरोबर झोप लागते व चोराचा फायदा होतो तरी अजून सुद्धा या ठिकाणी लाईट न लागण्याचे कारण काय ते स्पष्ट झालेले नाही. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांनी जर या डेकोरेशन वाल्याला मोबदला देण्याचा ठरलेला असून सुद्धा लाइटिंग का लागत नाही या गोष्टीची देवस्थान विचारणा का करत नाही असं सुद्धा आता प्रश्न पडलेला आहे
या ठिकाणी त्वरित पोलीस बंदोबस्त किंवा सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे कर्मचारी ग्रस्त वाढविणे जेणेकरून भाविकांचे पैशाची व किमती वस्तूंची चोरी होणार नाही असे मत आता भाविकांमधून व्यक्त होत आहे