भाटगांव येथे प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने गुरूवार 28/03/2024 पासून श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- वैकुंठवासी निवृत्ती त्रंबक मोरे रा.भाटगांव ता.चांदवड जि.नाशिक यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने भाटगांव व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आयोजित केला आहे.भागवताचार्य ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शिंदे B.E.Civil (अध्यापक,स्वा.सु.जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची )यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा होणार आहे. श्रीमद् भागवत कथा दैनंदिन कार्यक्रम गुरुवार दिनांक 28/3/2014 रोजी भागवत महात्मे,शुक्रवार दिनांक 29/3/2024 रोजी भक्त चरित्र कथा,शनिवार दिनांक 30/3/2014 रोजी सृष्टी उत्पत्ती कथा,रविवार दिनांक 31/3/2024 रोजी श्रीकृष्ण जन्म व इतर अवतार कथा,सोमवार दिनांक 01/04/2024 रोजी बाळकृष्ण लीला चरित्र,मंगळवार दिनांक 02/04/2019 रोजी गोवर्धन उद्धार रासलीला रुक्मिणी स्वयंवर,बुधवार दिनांक 03/04/2024 रोजी सुदामा चरित्र,एकादश,स्कंद परिक्षिती मोक्ष कथा आणि गुरुवार दिनांक 04/04/2024 रोजी सकाळी 9 ते 11 ह.भ.प. वैभवजी महाराज मोरे (भाटगांवकर) यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन महाप्रसादाने कथेची सांगता होईल. तरी पंचक्रोशीतील गुनिजन भाविक भक्तांनी या सुस्राव्य भागवत कथेस व महाप्रसादास आवर्जून उपस्थित रहावे,असे श्री.चैतन्य निवृत्ती मोरे यांनी सर्वांना निमंत्रित केले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण व्ही. एन. टेक ऍग्रो एजन्सीज भाटगांव ता.चांदवड जि. नाशिक.