
राज्यभरातून 16 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे घटाने जाहीर केली आहे. अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईमधून उमेदवारीची घोषणा केली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आणि अद्याप चार ते पाच उमेदवाराची घोषणा करणे बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागावरील निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे .आणि कल्याणच्या जागी सुद्धा अद्याप उमेदवारी जाहीर केली नसून कल्याण मध्ये महायुतीकडून जवळपास श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी निश्चित आहे. श्रीकांत शिंदे विरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलल्या जात आहे .लोकसभेच्या रिंगणातील ठाकरे यांचे शिलेदार खालील प्रमाणे, बुलढाणा – नरेंद्र खेडेकर , यवतमाळ + वाशिम – संजय देशमुख , मावळ – सरोज वाघेरे पाटील, सांगली – चंद्रदास पाटील , हिंगोली – नागेश पाटील अष्टेकर, छत्रपती संभाजी नगर – चंद्रकांत खैरे , धाराशिव – ओमराजे निंबाळकर, शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक – राजाभाऊ वाजे, रायगड – अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत, ठाणे – राजन विचारे, मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण – अरविंद सावंत, मुंबई वायव्य – अमोल कीर्तीकर, परभणी – संजय जाधव, मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई.