
सिन्नर – मागील 15 वर्षापासून मुसळगाव येथील इंडियाबुल्स या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी व उद्योजक यांचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत. व हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांच्यासोबत बैठक घेतली या बैठकीत भूसंपादन अधिकारी सुद्धा उपस्थित होते. आणि बैठकीनंतर लगेचच प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले. धोरणात्मक प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय ही या बैठकीत झाला.