
सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री ग्रामपंचायत ने आर. आर. पाटील.(आबा) सुंदर गाव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या योजनेअंतर्गत बारागाव पिंप्री व मुसळगाव या दोन ग्रामपंचायती ने या स्पर्धेत भाग घेतला होता. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीची तपासणी केली असता, गुणांकनाच्या आधारावर जास्त गुण प्राप्त झाल्याने बारागाव पिंपरी ग्रामपंचायतची तालुकास्तरीय पुरस्कारासाठी (१०लाख) निवड झाल्याची घोषणा केली आहे.