
भाटगांव- दि.21/03/2024 रोजी येवला तालुक्यातील मुखेड येथे संध्याकाळी 07 वा. पर्यंत 45 मेंढ्या मृत्युमुखी आजुन काहींची चिंताजनक परिस्थिती आहे. वंदना ज्ञानेश्वर गुमनर राहणार कानडगाव चांदवड तालुका व
हौशाबाई अंबादास भगत रा.महालखेडा यांच्या या मेंढ्या चारणीसाठी मुखेड ता.येवला या ठिकाणी चारणी साठी गेल्या. मेंढ्यांना ताप व सर्दी असल्याने ते येवला येथील स्वामी समर्थ मेडिकल मधुन औषध घेतले अक्षीतत मेंढपाळ असल्याने मेडीकल वरच्या कामगारांनी चुकीचे पध्दतीने औषध दिल्याने गणेश भगत यांच्या 35 आणि ज्ञानेश्वर गुमनर यांच्या 10 मेंढ्या चुकीच्या पद्धतीने औषध दिल्यामुळे दगावल्या. मुखेड येथील पोलीस पाटील मनोज दिनकर आहेर यांनीही भेट दिली व श्री भागवत झाल्टे यांना ज्ञानेश्वर गुमनर चांदवड यांनी फोन करून सविस्तर माहिती दिली. झाल्टे यांनी थेट चांदवड येथुन प्रत्यक्ष मुखेड येथे भेट देऊन पाहणी केली व नाशिक जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ.बी.आर.नरवाडे साहेब व धर्माधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली व आयुक्त साहेबांनी येवला येथील डॉक्टरांना पाठवून त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिले.आज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत 45 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या अजून काही अजून काहींची चिंताजनक परिस्थिती आहे.त्यामुळे यावर काय कारवाई होणार,मेंढपाळ 35 ते 40 लोक येवला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता दोन अडीच तास गेले तरीही कोणत्याही प्रकारचे तक्रार घेतली नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन तक्रार का घेत नाही अशी शंका मेंढपाळ यांच्या पुढे सध्या उभी राहिली आहे. सध्या दुष्काळ परिस्थिती असताना मेंढपाळांना सध्या कोणीही वाणी राहिले नाही,तरी मेंढपाळांना लवकरा लवकर न्याय मिळावा अशी मागणी वन्य प्राणी मित्र सामाजिक कार्यकर्ते श्री.भागवत झाल्टे यांनी केली आहे.