काल नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातील दुर्गम भागातील काहांडोळपाडा येथे मोहपाडा ते देवळाचा पाडा रस्त्यावर दमणगंगा नदीवरील पूलाच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला.
वैभव गायकवाड

दमणगंगा नदीवर सुमारे ११ कोटी रुपयांच्या निधीतून या पुलाची उभारणी होणार असून या सर्व पाड्यांतील नागरिकांना थेट तालुक्याच्या ठिकाणी जाता येणार आहे. यामुळे पावसाळ्यातही विद्यार्थ्यांना विनाव्यत्यय शाळेत, नागरिकांना आपल्या नित्यनेमाच्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जात येणार आहे. तर रुग्णांना देखील योग्य आरोग्य आणि वेळेत उपचार सुविधा मिळणे शक्य होणार असल्याचे मत यावेळी श्रीकांतजी शिंदे साहेबांनी व्यक्त केले.
याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब, आमदार सुहास कांदे साहेब, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी साहेब, माजी आमदार धनराज महाल साहेब यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.