गडमुडशींगी येथील दोषींवर कठोर कारवाईची मागणी आर पी आय खरात गटाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन कारवाई न केल्यास खरात गट आक्रमक भूमिका घेणार

तालुका करवीर येथील
गडमुडशिंगी येथील 4/5 लहान मुलांच्या वर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले त्या सराईत गावगुंडांना अट्रोसिटी कलम 307 लागू व्हावे या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनाआर पी आय खरात गटातर्फे देण्यात आले संबंधितांवर कलम 307व 120 अंतर्गत पोक्सो अंतर्गत कलम ऍड करून कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला तसेच संबंधित गावगुंडांवर कठोर शिक्षा व्हावी असे वकतव्य आर पी आय खरात गट कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष हर्षदकुमार कांबळे यांनी केले यावेळी उपस्थित कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आकाश कांबळे, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष हर्षदकुमार कांबळे , पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हर्षवर्धन आचार्य, माहिती अधिकार कार्यकर्ते देवदास कांबळे, धनंजय अजवेकर ,अभिजित कोगले, संस्कार कोठावळे, सुबोध कांबळे, जयकुमार कांबळे, आशुतोष कुरणे, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.