प्राणी मित्र श्री.भागवत झाल्टे यांचा प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून सत्कार
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- नाशिक जिल्ह्याचे प्रादेशिक सह आयुक्त डॉ. बी.आर.नरवाडे साहेब यांच्या कडून प्राणीमित्र श्री.भागवत झाल्टे यांच्या कार्याची दखल घेऊन भागवत भाऊ यांना आपल्या कार्यालयात बोलावून अभिनंदन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व तोंड भरून कौतुक केले. भागवत भाऊ चांदवड,येवला,नांदगाव तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या वन्य जीवांना जीवदान नव्हे तर पुनर्जीवनच देतात हि बाब पशू संवर्धन विभागाला माहीत झाली.यामुळे तात्काल दखल घेऊन पशु संवर्धन विभागाचे प्रादेशिक आयुक्त माननीय डॉ. बी. आर. नरवडे साहेब यांनी समक्ष बोलावून आपण प्रामाणिकपणाने निस्वार्थी कार्याची वन्यजीव तसेच वेगवेगळे प्रकारचे प्राणी बचाव कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या श्री.भागवत भाऊ झाल्टे यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या….याप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे पोल्ट्री संघटनेचे कार्याध्यक्ष श्री.दिपक भाऊ झाल्टे उपस्थित होते.. भाऊंच्या कार्याची दखल घेऊन श्री.भागवत झाल्टे यांना भविष्यात प्राणी मित्र पुरस्कार मिळेल असे मी आशा करतो कारण जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस झटणाऱ्या या निस्वार्थी समाजसेवकास शाबासकीची थाप मिळालीच पाहिजे अशा प्रकारे त्यांनी पुढील वाटचालीस मोरपंखी शुभेच्छा दिल्या.