आदिवासी बांधवांनी विकास योजनांबाबत जागरूक रहावे; आदिवासी संस्कृती, कला, नृत्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
वैभव गायकवाड

आदिवासी विकास विभाग, नाशिक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., नाशिक व भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ मर्या. (TRIFED) यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित आदिवासी कारागीर मेळावा पार पडला.
केंद्र सरकारच्या जनजातीय विकास विभाग, भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ तसेच राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग, शबरी आदिवासी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी बांधवांनी जागरूक राहून त्या योजनांचा लाभ करून घ्यावा. तसेच आदिवासी संस्कृती, कला व पारंपरिक नृत्यांचा वारसा पुढे सुरू राहण्यासाठी त्याची तालुका व जिल्हा पातळीवर नोंदणी होणे आवश्यक असल्याने त्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज दिल्या.
यावेळी डॉ प्रशांत भदाणे,योगेश बर्डे,सुनील पवार,जगन्नाथ कुवर,शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अतिरीक्त आयुक्त तुषार माळी यांच्यासह भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिव चलवादी, ट्रायफेडचे पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.