
सिन्नर – शहरा नजीक डुबेरे नाका परिसरात एक देशी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सह एकास पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले आहे. या संदर्भात गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हॉटेल रुद्रा परिसरात सापळा रचून संशयित आरोपी ज्ञानेश्वर उर्फ निलेश रामभाऊ शिंदे (43) राहणार ढोके फाटा यास पाठलाग करून ताब्यात घेतले. नुकतेच मागच्या आठवड्यात असेच एकाला एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुस सह स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. आणि एक आठवडा होत नाही तोच आणखी एकदा गुन्हे पथकाने एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली या कारवाईमुळे सर्वत्र पोलिसांची वाहवा होत आहे. संशयित आरोपी ज्ञानेश्वर शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय हत्या कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सुर्वे व त्यांचे पथक करत आहेत.