
पिंपळस (रामाचे) राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या संस्थेने राज्यभर मी ज्ञानी होणार हा उपक्रम सुरू केला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
या संस्थेअंतर्गत 25 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत जिल्हा परिषद शाळा पिंपळस रामाचे या शाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी सादिया रशीद शेख हिने घवघवीत यश मिळवले असून तिला 50 पैकी 48 मार्क मिळाले असून तिचा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक आला.
तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपालिक पिंपळस, शाळेचे मुख्याध्यापक श्री बटवल सर , हा उपक्रम राबवणारे शिक्षक श्री पाटील सर ,मोरे सर ,दलाल सर, पालवी सर , येशी सर , जाधव मॅडम, कसबे कर मॅडम, पैठणकर मॅडम, सोनवणे मॅडम, मोरे मॅडम ,भडके मॅडम, पंडित मॅडम या सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.