सामाजिक बांधकाम विभाग इतके आळशी असू शकते का ???

लासलगाव तालुका निफाड दिनांक 25 /7 /2022 रोजी सेवथ डे हायर सेकंडरी स्कूल या ठिकाणी अपघात झाला होता या अगोदर सुद्धा या ठिकाणी खूप अपघात झालेला आहे त्यामुळे अपघात क्षेत्र म्हणून घोषित झालेले असून तरी या ठिकाणी त्वरित सामाजिक बांधकाम विभाग यांनी गतिरोधक बसवावे अशी आशयाचे निवेदन दिनांक 1/8/2022 रोजी सामाजिक बांधकाम विभाग यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले होते परंतु शासकीय बांधकाम विभाग इतके आळशी असू शकते का असा प्रश्न आता पदाधिकारी यांना पडलेला आहे दोन महिने उलटून सुद्धा सामाजिक बांधकाम विभागाला अजून जाग आलेली नाही नेमकी कारण काय समजत नाही कारण यांच्याशी फोनवरती वेळोवेळी संपर्क साधून सुद्धा यांच्याकडून उत्तर येत नाही तरी याकडे त्वरित प्रशासनाने लक्ष द्यावे कारण अपघाताचे प्रमाण जर वाढले तर उद्या जीवितहानी किवा मोठा अपघात झाला त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता या ठिकाणी शाळेमध्ये जे मुले येतात त्यांच्या पालकांना पडलेला आहे
1/8/2022 रोजी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यांच्या वतीने शासकीय बांधकाम विभाग निफाड यांना निवेदन देण्यात आले होते की रेल्वे गेट ते संधान नगर या परिसरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाहतूक होत असते या वाहतुकीमध्ये पिकप ट्रॅक्टर्स बस टू व्हीलर यांचा समावेश आहे पुढे रेल्वे गेट असल्यामुळे गेट जर बंद होत असेल तर वाहनांची गती प्रमाणापेक्षा जास्त होते व त्यावेळेस जर अचानक शाळा सुटली तर अपघात होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी त्वरित गतीरोधक बसवावे जेणेकरून अपघात होणार नाही परंतु शासकीय बांधकाम विभाग यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असताना सुद्धा दोन महिने उलटून देखील सामाजिक बांधकाम विभाग यांनी लक्ष दिले नाही तसेच शेवंथ डे हायर सेकंडरी स्कूल या शाळेतील व्यवस्थापक यांना सुद्धा अर्ज देण्यात आला होता की या ठिकाणी शाळा आहे अशा प्रकारचे त्वरित बोर्ड लावावे जेणेकरून या ठिकाणी जे रहदारी होते त्यांना या बोर्डामुळे असे लक्षात येईल की या ठिकाणी शाळा आहे वाहने सावकाश चालवावे परंतु शाळेने सुद्धा विश्वगामी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याचे लक्षात आले तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे सा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी सुद्धा त्यांना वेळोवेळी बोर्ड लावावे असे सांगितले असताना सुद्धा त्यांच्या सांगण्याकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेले असून गेले दोन महिने झाले सामाजिक बांधकाम विभाग विभाग असेल किंवा शाळा व्यवस्थापक असेल कोणी याकडे लक्ष देत नाही उद्या जर मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे
शाळेच्या परिसरामध्ये कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेले नाही उद्या जर एखादी चुकीची घटना घडली तर याला जबाबदार कोण तसेच सामाजिक बांधकाम विभागाला लवकरच जाग येईल का अशी अपेक्षा पालक वर्ग व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित करत आहे जर लवकरात लवकर या ठिकाणी गतिरोधक बसवले नाही तर याला सर्वस्वी जबाबदार शाळा व्यवस्थापक व सामाजिक बांधकाम विभाग असेल असे मत येथे उपस्थित असलेल्या पदाधिकारी व पालक यांनी केला
तसेच 1/8/2022 रोजी निफाड या ठिकाणी सामाजिक बांधकाम विभाग पदाधिकारी यांना निवेदन देताना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव सोमनाथ मानकर नाशिक जिल्हा सचिव राहुल वैराळ निफाड तालुका अध्यक्ष दत्तात्रय दरेकर निफाड तालुका उपाध्यक्ष सुनील शिरसागर निफाड तालुका सचिव अनिल भावसार निफाड तालुका कार्याध्यक्ष अभय पाटील निफाड तालुका संघटक देविदास निकम व इतर पदाधिकारी उपस्थित होते