प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या लासलगाव शहर प्रमुख पदी अनिल भावसार यांची नियुक्ती
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव- संस्थापक अध्यक्ष मा ना श्री बच्चू भाऊ कडू याच्या अध्यक्षते खाली नासिक जिल्हाध्यक्ष ललित भाऊ पवार निफाड तालुकाध्यक्ष सोमनाथ धुमाळ,निफाड तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ दुसाने यांच्या उपस्थितीत अनिल भावसार यांनी लासलगावातील दिव्यांगांचे केलेल्या कामाची दखल घेत आज रोजी
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या लासलगाव शहर प्रमुख पदी अनिल भावसार यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले
असेच काम पुढे चालू ठेवा व प्रत्येक दिव्यांगापर्यंत शासकीय योजना पोहचल्या पाहिजे असे मत जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी सांगितले वरीष्ठनकडून जी काही मदत लागेल ती मला सांगा असेल वक्तव्य ललित पवार यांनी केले
निफाड तालुका अध्यक्ष सोमनाथ धुमाळ यांनी देखील दिव्यांगांना मिळणाऱ्या शासकीय योजना बद्दल माहिती दिली
तालुका उपाध्यक्ष राजाराम दुसाने यांनी देखील दिव्यांगांना मिळणाऱ्या सुविधा व शासकीय लाभाबद्दल मार्गदर्शन केले
नवनिर्वाचित प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या लासलगाव शहर प्रमुख पदी निवड झालेले अनिल भावसार यांनी दिव्यांगांसाठी निस्वार्थ काम करण्याची ग्वाही वरिष्ठांना या वेळेस अनिल भावसार यांनी दिली
लवकरच लासलगाव प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणार असल्याची माहिती लासलगाव शहर प्रमुख अनिल भावसार यांनी दिली
यावेळी दिव्यांग बांधव भुपेंद्र जैन, राजू सुरसे,मनोज परेराव,तौसिफ शेख,प्रविण गाढे,लक्षुमन बैरागी, सुर्वे ताई,शरद साबळे, रामराव गव्हाणे ,
सागर धुमाळ, नाईक सर आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते