
सिन्नर – शिर्डी महामार्गावर नाकाबंदी दरम्यान मुरूम खनिजाची वाहतूक करणारा एक हायवा डंपर वावी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पकडला. मुरूम या गौण खनिजाची वाहतूक करत असताना त्यांचा परवाना व रॉयल्टी बाबतच्या कागदपत्राची तपासणी केली असता परवाना व रॉयल्टी नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. या प्रकरणी वावी पोलिसांनी संशयीता वर गौण खनिजाची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. व हायवा क्रमांक एम एच 17 बी वाय ८७४३ पोलिसांनी जप्त केला आहे.