ताज्या घडामोडी

सांगलीच्या समाजसेविका जयश्रीताई पाटील यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड

सांगली येथील समाजसेविका जयश्रीताई पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजित दादा पवार व राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस पदी नियुक्त करण्यात आली

त्यांना या निवडीचे पत्र सांगली जिल्हा शहराध्यक्ष माननीय प्राध्यापक पद्माकर जगदाळे सर ,प्रदेश उपाध्यक्ष माननीय सुरेश आण्णा पाटील ,कार्याध्यक्ष माननीय जमीर भैय्या बागवान ,सांगली जिल्हा नियोजन समिती माननीय वीरेंद्र दादा थोरात ,महिला सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय राधिका ताई हारगे ,यांच्या हस्ते देण्यात आले

समाजसेविका जयश्रीताई पाटील यांची सामाजिक कार्यातील ओळख म्हणजे जयश्रीताई पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जयश्रीताई पाटील युवा मंच महाराष्ट्र राज्य असे त्यांनी संस्था स्थापन केली आहे गेली दहा वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून त्यांची ओळख आहे कोरोना काळामध्ये कोरोना पेशंट ना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे त्यांची देखभाल विचारपूस करणे जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना जेवणाचे डबे देणे औषधे किट वाटप करणे मास्क सॅनिटायझर वाटप करणे , महापुरातून लोकांना पाण्यातून बाहेर काढणे त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था करणे औषधाची व्यवस्था करणे इत्यादी सामाजिक कार्य केली आहेत नागरिकांना योग्य त्या शासकीय योजनेचा लाभ घेऊन देणे, किरकोळ गोष्टीवरून ज्यांचे संस्कार तुटण्याच्या मार्गावर येतात त्यांना योग्य तो सल्ला देऊन परत त्यांचे संसार सुरळीत करून देणे तसेच महिला वरील होणारी अत्याचार विरोधात जनजागृती करणे ,बेरोजगार युवक युवतींना छोटे-मोठे उद्योगधंदे काढण्यासाठी मार्गदर्शन मेळावा घेणे, म्हणूनच त्यांच्या या कामाची पोच पावती म्हणून त्यांना आतापर्यंत आदर्श समाजसेविका म्हणून सांगली कोल्हापूर व इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र व गुजरात राज्यांमध्ये सुद्धा कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे असेच विकास कामांमध्ये अग्रेसर असणाऱ्या जयश्रीताई पाटील यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे

या कार्यक्रमात उपस्थित सर्व पदाधिकारी सांगली, मिरज ,कुपवाड, फ्रंटल सेलचे सर्व मुख्य पदाधिकारी अल्पसंख्याक अध्यक्ष युवक महिला पदाधिकारी उपस्थित होते

या निवडीमुळे त्यांचे सांगली व इतर सर्व भागातून अभिनंदन केले जात आहे

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.