ताज्या घडामोडी
पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पोत खेचून पसार.

सिन्नर-प्रतिनिधी शहरातील कमला नगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी पायी चालत आलेल्या महिलेच्या गळ्यातून अडीच तोळ्याची सोन्याची पोत होरबडून नेल्याची घटना नुकतीच घडली असून सदर महिला कविता रमेश फापाळे राहणार गोजरे मळा 45 ह्या कमला नगर परिसरातून पायी जात होत्या .समोरून दुचाकी वर डबल सीट दोन भामटे आले व त्यांच्या अगदी जवळ येऊन चालत्या दुचाकीवरून मागे बसणाऱ्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची पोत ओढली. व पळून गेले. त्यानंतर कविता यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात दुचाकी धारकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे .याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कोठाळे अधिक तपास करीत आहेत.