ताज्या घडामोडी
हुपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे सुशोभीकरण शुभारंभ

हातकणंगले मतदारसंघातील
हुपरी शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्ती व परिसर सुशोभीकरणाचा शुभारंभ माजी मंत्री, आमदार सतेज पाटील, आमदार राजू आवळे व राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. शिवतिर्थासाठी व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधि कमी पडू देणार नाही अशी ग्वाही सतेज पाटील यांनी दिली.
येथील अश्वारूढ शिवमूर्ती कामासाठी 25 लाख रूपये देण्याची ग्वाही आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे ,महावीर गाट , मुरलीधर जाधव , शामराव गायकवाड , शामराव मेथे ,गणेश वाईगडे ,सुरेश काटकर ,संताजी हांडे, दौलतराव पाटील , विलासराव नाईक ,आण्णासाहेब भोजे , शिवराज नाईक ,सतीश भोजे, प्रकाश जाधव ,सुरज बेडगे, अमेय जाधव , अमर माने आदी उपस्थित होते.