ताज्या घडामोडी
ऑनलाइन द्वारे फसवणूक लाखाला गंडा

सिन्नर- दापूर येथे 98 85 58 04 15 या क्रमांकावरून एका भामट्याने एकाला फोन करून लाखाचा गंडा घातल्याची घटना नुकतीच घडली. गणेश झुंबर बोडके( 40 )रा. दापूर यांच्या मोबाईलवर वरील क्रमांकावरून फोन आला व फोनवरील समोरच्या व्यक्तीने बोडके यांना कोटी-नाटी माहिती देऊन त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन्ही ही बँकेच्या खात्यामधून 92 हजार 777 रुपये त्याच्या यूपीआय आयडीवर ट्रान्सफर करून कोडके यांची फसवणूक केली .आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बोडके यांनी वावी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली, व अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास करण्याचे काम चालू आहे.