ताज्या घडामोडी
निमगाव येथे बिबट्या जेरबंद

सिन्नर- रात्रीच्या वेळी मुक्त संचार करणारा बिबट्या जेरबंद झाल्याची घटना घडली. संजय पुंजा ठोक यांच्या शेत गट नंबर 16 मध्ये वनविभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात असलेला अंदाजे एक ते दीड वर्षाचा नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाला आज पहाटे माहिती मिळतात वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. एम. बोडके,टी .व्ही .कांगणे ,मधुकर शिंदे ,रोहित लोणारे ,रवी चौधरी हे घटनास्थळी पोहोचले व बिबट्याला सुरक्षितपणे घेऊन मोहदरी येथील वन उद्यानात आणून ठेवले आहे.