
लासलगाव : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभाग (IQAC) आणि कला मंडळाच्या वतीने आयोजित शेलापागोटे याविषयी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी डॉ.प्रणव खोचे आणि प्रा.किशोर गोसावी हे व्याख्याते म्हणून लाभले.
महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष विभाग आणि कला मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी झालेल्या शेलापागोटे कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे हे अध्यक्षस्थानी होते तसेच याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, डॉ. संजय निकम, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, कला मंडळाचे सदस्य प्रा.गुरुदेव गांगुर्डे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.महेश होळकर, प्रा.श्रीराम कंधारे, प्रा.सृष्टी थोरात, प्रा.अश्विनी बोरसे इ. उपस्थित होते.
या कार्यशाळेप्रसंगी डॉ.प्रणव खोचे आणि प्रा.किशोर गोसावी यांनी फिश सादरीकरण कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कला मंडळ प्रमुख प्रा.किशोर गोसावी आणि कला मंडळातील सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. प्रा.सृष्टी थोरात यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.श्रीराम कंधारे यांनी आभार मानले. या कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.