लासलगाव महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव दिनांक ३०-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे बहि:शाल शिक्षण मंडळ व नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. ‘अंदश्रदा निर्मूलन’ या विषयावर दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी प्राचार्य डॉ.किशोर पवार यांनी पहिले पुष्प गुंफले. त्यांनी त्यांच्या व्याख्यानात दैनंदिन जीवनात सर्वानी अंधश्रद्देपासून दूर राहिले पाहिजे हे प्रत्यक्षिकेद्वारे विशद केले. दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी ‘शिवाजी महाराज’ या विषयावर प्रा.डॉ.लता पवार यांनी दुसरे पुष्प गुंफले. त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून शिवाजी महाराज रयतेचे राजे होते त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ.शामकुमार दुसाने यांनी दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी ‘आरोग्य निसर्गोपचार’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाने आयुष्यात आपल्या आरोग्याचि काळजी निसर्गाच्या सानिध्यात राहून घेतली पाहिजे व छान जीवन जगावे असे मार्गदर्शन केले.
सदर व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी नूतन विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.श्री.गोविंदरावजी होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेचे संयोजन केंद्रवाह डॉ.राजेश शंभरकर यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील डॉ.दत्त्तात्रय घोटेकर, डॉ.बाजीराव अहिरे, डॉ.प्रणव खोचे, प्रा.मिलिंद साळुंके, प्रा.अमोल पुंड, प्रा.हर्षल कदम, प्रा.संदीप शिंदे, प्रा.परशराम पानसरे, प्रा.वाल्मीक आरोटे या प्राध्यापकांनी देखील व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या व्याख्यानमालेला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थीत होते.