
महाराष्टातील लोकसभा संदर्भात हॉटेल रॉयल हेरिटेज येथे बहुजन समाज पार्टी (बसपा )या राष्टीय पार्टीची महत्वपूर्ण बैठक पार पडली यात बसपा ची पहिली यादी जाहीर करण्यात आली, अनु. जमाती दिंडोरी राखीव लोकसभाच्या जागेसाठी प्रा. टी. सी. खोटरे यांना बसपा पार्टी कडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, यावेळी बसपा प्रदेश महा सचिव मा. इंजि. तायडे साहेब, जिल्हा अध्यक्ष मा अरुण काळे साहेब, लालचंद सिरसाट, प्रा. पाटील सर, आडवोकेट जाधव, मछिंद्र आहेर, धर्मराज सर, नाथभजन सर, भूषण सर डॉ. आहिरे, सुर्वे सर मंडलिक सर, आदी राज्य कार्यकारणी चे तसेच जिल्हा कमिटी आजी -माजी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते, कळवण -सुरगाणा, पेठ-दिंडोरी, चांदवड -देवळा, नांदगाव, येवला, निफाड या लोकसभा तालुक्यातील अनेक पदधिकारी उपस्थित होते.