लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठ येथे महायुतीची समन्वय बैठक पार पडली
वैभव गायकवाड

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठ येथे महायुतीची समन्वय बैठक पार पडली बैठकी दरम्यान महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली व माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे, मा.उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, मा. उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत घडविण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, सरचिटणीस शरद कासार तालुका अध्यक्ष पंकज पाटील, नगर अध्यक्ष करण करवंदे, शिवसेना तालुका अध्यक्ष पद्माकर कामडी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष गिरीश गावित, नगरसेवक लता गायकवाड, सरिता हाडळ, जितेंद्र जाधव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विशाल जाधव, मनसे युवा अध्यक्ष अक्षय गवळी, विधानसभा प्रमुख संजय वाघ, संतोष डोमे, शिवसेना शहर अध्यक्ष त्र्यंबक कामडी, आरपिआय अध्यक्ष अशोक ताठे, भाजपा शहर अध्यक्ष सागर डोगमाने, ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ भडांगे, रघु आपा चौधरी,चंद्रशेखर काळे, श्याम काळे, चंदर भांगरे, विजय देशमुख, युवा नेते चेतन निखळ,राजू गायकवाड, राजू भोये, चिंतामण महाले, केशव कुवर, पंचायत राज अध्यक्ष संगीता सहारे, सरपंच संदीप भोये,जगणं रींजड,गीता जाधव घनश्याम महाले,रामेश्वर काळे सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.