महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न.
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव दि.२३ : नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव वरिष्ठ महाविद्यालय विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालय (+२ स्तर) च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन आज दि. 23/12/2023 रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव (साळ.), ता.चांदवड येथे संपन्न झाले. स्वागतगीताने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरसावती पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नूतन विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य मा.श्री.हसमुखभाई पटेल, यांनी भूषविले. शिबीराचे उदघाटन वडाळीचे सरपंच मा.श्री नितिनदादा आहेर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना आयुष्यभराची शिदोरी प्राप्त होते. त्यांनी जीवनात शिबिराचे महत्व व आपल्या कामातून गावात ठसा उमटविण्याचे आवाहन करून योगासन, श्रमदान, संस्कार, व्यक्तिमत्व विकास आदी विषयांवरती विद्यार्थ्यांच्या मनात जनजागृती होते तसेच ग्रामविकासाच्या विविध योजना यांची माहिती दिली जाते यातून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व फुलते त्याच्या अंगी लोकशाहीचे संस्कार बिंबवले जातात. स्त्री पुरुष समानता हे तत्व ते अंगिकारतात. स्वावलंबन आणि आदर्श माणूस म्हणून जगण्याचे संस्कार या सात दिवसात विद्यार्थ्यांना मिळतात. राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी हा आयुष्यभर स्वयंसेवक म्हणून समाजात वावरतो असे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले.
कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे यांनी प्रास्ताविकातून या शिबिरांतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर शनिवार दिनांक २३/१२/२०२३ ते शुक्रवार दिनांक २९/१२/२०२३ या कालावधीत मु.पो. वाहेगाव साळ, ता.चांदवड, जि.नाशिक या ठिकाणी संपन्न होत आहे. या श्रमसंस्कार शिबिरात वृक्षारोपण, कचरा-पाणी व्यवस्थापन, माती-पाणी परीक्षण, ग्राम स्वच्छता, स्वच्छ भारत अभियान, नव मतदार नोंदणी, मूल्यशिक्षण, महिला सबलीकरण, पर्यावरण जनजागृती, रस्ता सुरक्षा अभियान, आरोग्य शिबिर व आरोग्य सर्वेक्षण असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे स्पष्ट केले. लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना हे महाविद्यालयीन तरुणांना स्वावलंबन,चारित्र्य संवर्धनाची शिकवण देणारी युवक चळवळ आहे. विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी गावात श्रमदान करतात. ग्राम विकासाचे उपक्रम राबवितात. श्रमाचे संस्कार केले जातात. राष्ट्रीय सेवा योजना हे श्रमसंस्काराचे विद्यापीठ आहे. असे प्रतिपादन डॉ.आदिनाथ मोरे यांनी केले. यावेळी गावचे माजी सरपंच श्री.केशव खैरे यांनी सात दिवसाच्या शिबिरात व्यक्तिमत्व विकसित करून समाजात स्वतःची विशेष प्रतिमा निर्माण करावी असे आवाहन केले.
तसेच गावचे पोलीस पाटील श्री.दिपक खैरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, लासलगाव महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आमचे गाव दत्तक घेऊन ग्राम स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, अन्नसुरक्षा, रस्ता सुरक्षा अभियान,अशा विविध उपक्रमाविषयी समाजात जनजागृती करावी असे आवाहन केले. तसेच सर्व शिबिरार्थींना देखील याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपात मा.श्री.हसमुखभाई पटेल यांनी यांनी संस्थेचा व महाविद्यालयाचा नावलौकीक वाढेल यादृष्टीने विद्यार्थ्यांनी काम करावे तसेच श्रम संस्कारातून विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्वगुण विकसित होऊन संघटन कौशल्य प्राप्त होते. सर्व स्वयंसेवकांनी शिबिराच्या माध्यमातून समाजविकास व व्यक्तिमत्वाचा विकास साधावा असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिल गायकर यांनी तर आभार प्रा.देवेंद्र भांडे यांनी मानले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी मा.श्री.साहेबराव चव्हाण (सरपंच, पाटे), मा.श्री.एन.एस.मंडलिक (अध्यक्ष, म.फु.सा.कला क्रीडा व शिक्षण संस्था वाहेगाव), मा.श्री संदीप पवार (सरपंच, वाहेगाव), मा.सौ.सीमाताई न्याहारकर (उपसरपंच, वाहेगाव), मा.श्री केशव खैरे (माजी सरपंच, वाहेगाव) सौ.ज्योती खैरे (सदस्य ग्रामपंचायत), मा.श्री.चिंतामण रसाळ (चेअरमन, सोसायटी), मा.श्री.बाजीराव खैरे माजी चेअरमन) मा.श्री.केशवराव ठाकरे, मा.श्री.नंदकुमार मंडलिक, लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, डॉ नारायण जाधव, डॉ.विलास खैरनार, पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, प्रा रावसाहेब खुळे, प्रा.श्रीमती दिपाली कुलकर्णी प्रा.रामसिंग वळवी, प्रा.प्रभाकर गांगुर्डे, प्रा.जितेंद्र देवरे, प्रा.महेश होळकर, प्रा.दत्तात्रय गायकवाड, डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.उज्वला शेळके, प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.मारोती कंधारे प्रा श्रीमती लता तडवी तसेच यावेळी वाहेगाव साळ ग्रामपंचायत सर्व सदस्य, विविध कार्यकारी सेवक सहकारी सोसायटी सदस्य, गावातील तरुण मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शिक्षक- शिक्षकेतर वृंद, रा.से.यो. स्वयंसेवक इत्यादी उपस्थित होते.