लासलगाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वाहेगाव साळ मधील ग्रामस्थांची आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालय, वाहेगाव साळ, तालुका चांदवड या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिरामध्ये लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ.कैलास पाटील, डॉ.ठाकरे, डॉ.महाले, डॉ.नितिन न्याहारकर यांनी शिबिराला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची अशी एकूण 52 स्त्री व पुरुषांची आरोग्य तपासणी करून आरोग्य विषयक मार्गदर्शन देखील केले.
डॉ.कैलास पाटील, डॉ.ठाकरे, डॉ.महाले, डॉ.नितिन न्याहारकर यांनी आरोग्य शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स आणि शिबिराला उपस्थित असलेले शिबिरार्थी यांचे महाविद्यालयाचे नक्षत्र व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, डॉ.उज्वला शेळके, प्रा.मारुती कंधारे, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.लता तडवी आणि सर्व स्वयंसेवकांनी खूप परिश्रमपूर्वक शिबिराचे नियोजन केले. त्यामुळेच हे शिबीर यशस्वी झाले.