कोरोची मधील शंकर कोयला एजन्सी ला अखेर लागले ताळे

कोरोची मधील शंकर कोयला
एजन्सी नावाचा कोळसा कारखान्याचा अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता. त्या
ठिकाणची असणारी शेजारी घरे त्यामध्ये अन्न पाण्यामध्ये ,घरामध्ये सर्व ठिकाणी कोळशाची पावडर हवेत उडून येत होती आणि त्यामुळेच त्या भागातील चार नागरिकांना घशाचा कॅन्सर झाला आहे. या कारखान्यामधून येणाऱ्या हवेतील कोळशाच्या धुळीमुळे होणारे प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सॅम आठवले व युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने एक वर्षापूर्वी हे आंदोलन हाती घेतलं होते .त्यानंतर वेळोवेळी मोर्चे, निवेदने ,गाव सभेमध्ये मांडणी आणि कायदेशीर भूमिका घेऊन आज अखेर कोळसा कारखान्याचे पाणी व लाईट कनेक्शन बंद करून कोळसा कारखाना बंद केला .त्यामध्ये कोरोची चे विद्यमान सरपंच मा संतोष भोरे यांनी प्रशासनातून ठामपणे भूमिका मांडून हा कारखाना बंद करण्यामध्ये मोलाचे सहकार्य दिले. या अनुषंगाने भागातील नागरिकांनी त्या ठिकाणी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला व आंदोलनामधील सहभागी प्रमुख व्यक्तींचा त्या ठिकाणी आभार मानले. त्यावेळी उपस्थित सॅम आठवले, सरपंच मा.सतोष भोरे, उपसरपंच मा.विकी माने, विजय चव्हाण, सदाशिव बंडीगणी,संजय कोरवी, हुसेन पटेल व त्या ठिकाणचे प्रमुख व्यक्ती व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.