
मनमाड शहर नेहरू भवन एकलव्य नगर येथील 7 वर्षीय लोकेश सुनील सोनवणे या लहान मुलाची आज निर्घून पणे हत्या झालेली आहे. प्रथम दर्शी हा नरबळी चा संशय येतो. हत्या होण्यापूर्वी हा बालक २ दिवसांपासून बेपत्ता झाल्याने त्याच्या पालकांनी बेपत्ता असल्याची नोंद ही केलेली होती, आज दिनांक १ डिसेंबर ला हत्या करून रेल्वे रुळावर तुकडे करून फेकून देण्यात आले. म्हणून लहान बालकाची हत्या करणाऱ्या नराधमास खुण्यांना प्रशासनाने त्वरित पकडावे व पीडित बालकाला न्याय मिळून द्यावा अन्यथा बहुजन समाज पार्टी मनमाड शहर तसेच नांदगाव विधानसभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आसून, या लहान बालकाच्या हत्येमुळे मनमाड शहरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.