नांदगाव तालुका प्रमुख संतोष अण्णा गुप्ता यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्या बद्दल मनमाड आणि नांदगाव बंद
ज्ञानेश्वर पोटे

मनमाड– शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदगांव तालुका प्रमुख श्री. संतोष आण्णा गुप्ता यांचेवर राजकीय षडयंत्र रचुन खोटा गुन्हा दाखल करणेत आल्या बाबत मा. पोलीस निरीक्षक सो. नांदगाव शहर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर खोटा गुन्हा दाखल केल्या बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे…
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदगांव तालुका प्रमुख श्री. संतोष आण्णा गुप्ता है नांदगांव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी असुन त्यांचे अनेक वर्षापासुन नांदगांव शहरात किराणा मालाचे दुकान आहे, सदरचा व्यवसाय करीत असतांना व त्यांचे बाबत कोणाचीही तक्रार नसतांना यांचेवर दि. 24/06/2024 रोजी नांदगांव तालुक्यातील राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली येवुन पोलीस यंत्रणेने कोणतीही शहानिशा व योग्य ती
चौकशी न करता त्यांचे दुकानात गांजा सापडल्याचे सांगत खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. श्री. संतोष आण्णा गुप्ता हे केवळ शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदगांव तालुका प्रमुख असल्याने राजकीय आकसापोटी त्यांचे विरुध्द षडयंत्र रचुन त्यांना खोट्या गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यामध्ये अडकविणेत आले आहे. जो गुन्हा दाखल झाला आहे,त्याचे समर्थन कोणीही करणार नाही, परंतु केवळ राजकीय द्वेषापोटी तसेच षडयंत्र रचुन त्यांचेवर सदर खोटा गांजा बाळगल्याचा गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदर गुन्ह्याची पोलीस यंत्रणेने योग्य प्रकारे सगळ्या बाजु तपासुन व सर्व प्रकारची शहानिशा करून सदर गुन्हा दाखल होणे अपेक्षीत होते, परंतु असे न होता श्री. संतोष आण्णा गुप्ता यांचेवर सदरचा घोटा गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदरचा गुन्हा हा पोलीस यंत्रणेने कोणतीही शहानिशा व चौकशी न करता दाखल केलेला असल्याने सदरचा खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा नांदगांव तालुक्यातील सर्व पक्षीय व नांदगांव विधानसभा मतदार संघातील तमाम जनतेच्या वतीने दि. 25/06/2024 रोजी तीक्ष्ण स्वरुपाचे आंदोलन करून या निषेधार्थ नांदगांव व मनमाड शहरात कडकडीत बंद ठेवणेत आलेले आहे , व त्यास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाचदार असून सदर गुन्ह्याची योग्यती तपासणी व चौकशी करून या खोट्या गुन्ह्यातुन श्री. संतोष आण्णा गुप्ता यांची मुक्तता करणेत यावी ही विनंती. तसे न झाल्यास अशा प्रकारचे खोट्या गुन्ह्यांचे सत्रा विरुध्द तीव्र स्वरुपाचे सर्वपक्षीय आंदोलन उभारणेत येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची व या संबंधी इतर घटकांची राहील याची नोंद घ्यावी.
अशा प्रकारचे निवेदन नांदगाव शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.