ताज्या घडामोडी

सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ गोसावी यांची मागणी सिन्नर येथील शिवाजी नगर या नगराला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नाव देण्यात यावे

मुख्य संपादक राहुल वैराळ

सिन्नर – येथील शिवाजीनगर या नगराला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नाव देण्यात यावे विषयाचे निवेदन माननीय श्री तहसीलदार साहेब तहसील कार्यालय सिन्नर यांना श्री दत्तात्रय गोसावी भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका उपाध्यक्ष यांनी दिनांक 22.9.2023. रोजी दिले या निवेदनात असे म्हटले की सिन्नर शहरांमध्ये धनकांती हायटस शिवाजीनगर गार्डन पंचवटी हॉटेल शेजारी येथे मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्य करतात या नगरामध्ये हॉस्पिटल किराणा व्यवसायिक हॉटेल्स इत्यादी छोटे-मोठे व्यवसाय चालू आहे परंतु येथे प्रत्येक नागरिक हा या भागाला शिवाजीनगर असे एकेरी नावाने बोलत असतो तरी आपण या निवेदनाची दखल घेऊन दिनांक 24.9.2023. रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा द्वितीय राज्याभिषेक दिन हा साजरा केला जातो तेव्हा या दिवसापासून वरील शिवाजीनगर या नगराला छत्रपती शिवाजी महाराज नगर या नावाने संबोधण्यात यावे तसेच शासकीय पत्रवरांमध्ये देखील ही महाराजांच्या एकेरी नावाचा उल्लेख न करता छत्रपती शिवाजी महाराज नगर या नावाचा उल्लेख करावा असे निवेदनात म्हटले आहे

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.