लासलगांव-विंचूर मधून प्रथमच केदारनाथ,ब्रदीनाथ यात्रा HF Deluxe / हिरो होंडा शाइन मोटरसायकल वारी

प्रथमच लासलगाव विंचूर येथून चार युवक मोटरसायकलवर चारधाम केदारनाथ, बद्रीनाथ यात्रा करून आले आहे. लासलगाव म्हटले की बाबा अमरनाथ ग्रुप यांच्यामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या बाबा अमरनाथ यात्रा उत्सव त्यामुळे लासलगांवला यात्रेला जाणाऱ्या भाविकांची उत्सुकता बघायला मिळत आहे. तसेच केदारनाथ बाबा ला जाणारी संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोणी ट्रॅव्हल्स,रेल्वे चारचाकी वाहने यांनी जाताना बघत आलोय. पण चार भोले भक्त यांनी मोटरसायकल ( HF Deluxe ) MH 15 तसेच दूसरी बाईक ( होंडा शाईन ) नासिक पासिंग गाडी चक्क उत्तराखंड चारधाम यात्रा करून आली आहे. केदारनाथ बाबा भोले भक्त त्यात १३ वर्षांचा लहान मुलगा तो ही मोटरसायकल वर यात्रा पूर्ण करून आला आहे.
चांदवड रेणुकामाता दर्शन, गणपती मंदिर दर्शन, उज्जैन महाकाल दर्शन,आग्रा, मधुरा, दिल्ली, हरिद्वार, देहरादून, मसुरी, यमुनोत्री उत्तरकाशी, गंगोत्री, केदारनाथ, ब्रदीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार असा ४१८७ किलोमीटर २४ दिवसात प्रवास पूर्ण केला आहे.भोले भक्त चार भाविकांनी मोटरसायकल द्वारे उत्तराखंडची (चारधाम) यात्रा पूर्ण केली. त्यात लासलगांव व विंचूर मधून संदिप जगताप, अंचित पाटील, अभय पाटील, रामेश्वर भुताडा यांनी प्रथमच बाईकवर चारधाम यात्रा केली आहे.
पहिले धाम यमुनोत्री, दूसरे धाम गंगोत्री, तिसरे धाम केदारनाथ आणि चौथ धाम ब्रदीनाथ ही
यात्रा बाईक वर पूर्ण केली आहे.
पहिला दिवस चांदवड रेणुकामाता मंदिर दर्शन घेऊन
उज्जैन महाकाल दर्शन
मुक्काम ४२१ किलोमीटर प्रवास
दुसरा मुक्काम उज्जैन ते आग्रा ५७६ किलोमीटर प्रवास मुक्काम,
तिसरा दिवस आग्रा ताजमहाल,
चौथा दिवस आग्रा ताजमहाल ते हरिद्वार ३३८ किलोमीटर प्रवास,
पाचवा दिवस हरिद्वार ते मसुरी ७४ किलोमीटर प्रवास मुक्काम,
सहावा दिवस मसुरी ते यमुनोत्री
१३५ किलोमीटर प्रवास मुक्काम,सातवा दिवस यमुनोत्री ते उत्तरकाशी केदार घाट
१२९ किलोमीटर प्रवास मुक्काम,आठवा दिवस उत्तरकाशी ते गंगोत्री धाम ९९ किलोमीटर प्रवास मुक्काम,
नववा दिवस गंगोत्री धाम ते उत्तरकाशी केदार घाट मंदीर ९९ किलोमीटर प्रवास मुक्काम
दहावा दिवस उत्तरकाशी केदार घाट ते केदारनाथ ( सितापूर पार्किंग ) २२१ किलोमीटर प्रवास मुक्काम
आकरा दिवस सितापूर पार्किंग ते केदारनाथ धाम मंदिर दर्शन पायी २३ किलोमीटर प्रवास मुक्काम
बारवा दिवस केदारनाथ धाम दर्शन वार सोमवार त्यात प्रदोष असल्याने खूप खूप छान दर्शन झाले आणि संध्याकाळ ची आरती मिळाली.
केदारनाथ मंदिर परिसर ( देवभूमी ) मध्ये निसर्गाचा आणि मुक्कामाचा पूरेपूर आनंद घेतला.
तेरवा दिवस केदारनाथ भोले बाबा चे मुक दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू पायी २३ किलोमीटर सितापूर पार्किंग मध्ये मुक्काम
चौथवा दिवस सितापूर पार्किंग ते ब्रदीनाथ धाम १९१ किलोमीटर प्रवास मुक्काम
पंधरा दिवस ब्रदीनाथ धाम मंदीर दर्शन मुक्काम
सोहळवा दिवस ब्रदीनाथ धाम ते माना गावं रिटर्न ब्रदीनाथ धाम मुक्काम
सतरवा दिवस ब्रदीनाथ धाम धारी देवी दर्शन ९१ किलोमीटर प्रवास मुक्काम
आठरवा दिवस धारी देवी ते हरिद्वार गंगा दर्शन आरती १३८ किलोमीटर प्रवास मुक्काम
एकोणाविस दिवस हरिद्वार मानसा देवी
वीस दिवस हरिद्वार ते दिल्ली अक्षरधाम मंदीर १८८ किलोमीटर प्रवास मुक्काम
एकविस दिवस दिल्ली अक्षरधाम मंदीर ते मधुरा १४८ किलोमीटर प्रवास मुक्काम
बावीस दिवस मधुरा ते नौगाव
४०० किलोमीटर प्रवास मुक्काम
तेवीस दिवस बोलाई हनुमान मंदिर दर्शन ४२८ किलोमीटर प्रवास मुक्काम
चोवीस दिवस बोलाई हनुमान मंदिर दर्शन ते विंचूर ५११ किलोमीटर प्रवास
जवळपास मोटरसायकल वर ४१८७ किलोमीटर प्रवास २४ दिवसात सुखरूप पूर्ण केला आहे.