ताज्या घडामोडी
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन तर्फे लासलगाव येथील…………
श्री ज्ञानेश्वर भवर कोटमगाव

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन तर्फे लासलगाव येथील कलगिधर इंग्लिश मीडियम स्कूल चे प्रिन्सिपल श्री दीपक जी बाबरे सर यांना दिनांक 6/1/2023 रोजी मुंबई येथील नेहरू सेंटर वरळी मध्ये स्टार एज्युकेशन अवार्ड यांच्यातर्फे प्रिन्सिपल दीपक जी बाबरे सर यांना एक्सलंट प्रिन्सिपल अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री दीपक जी केसरकर उपस्थित होते त्यांनी सर्व शिक्षक मुख्याध्यापक व संस्थाचालकांना उपदेश पर भाषण दिले शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थाचालकांचे व मुख्याध्यापकांचे आभार मानले त्याचप्रमाणे श्री दीपक जी बाबरे सर यांचे शालेय कमिटी व कर्मचारी पालक वर्ग व कोटमगाव ग्रामस्थ यांनी केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले