चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदांची बिनविरोध निवड करण्यात आली
संपादक सोमनाथ मानकर

चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदांची बिनविरोध निवड करण्यात आली
परीवर्तन पॅनल चे सर्व उमेदवार मोठ्या संख्येने निवडुन आले सरपंच पदाची निवड ही जनतेच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेतून करण्यात आली
उपसरपंच पदाची निवड ही सदस्यांच्या बिनविरोध मतांनी करण्यात आली यापैकी सरपंच पदी सौ हिराबाई यशवंत पगार यांची निवड तर उपसरपंच पदी श्री किरण बाळनाथ भवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली
ग्रामसेवक सिमा समशेर व निवडणूक अधिकारी व्ही एच ठाकरे यांनी कामकाज पाहिले.
सरपंच सौ हिराबाई यशवंत पगार उपसरपंच श्री किरण बाळनाथ भवर व सदस्य सौ मंगल सोनवणे ,सौ सोनाली मोरे ,सौ निशा सोमवंशी, सौ मंगल शेजवळ ,सौ आशा सोनवणे व श्री रावसाहेब पोटे उपस्थित होते
या निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर सरपंच उपसरपंच व सदस्य यांची गावातुनं मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली त्यावेळेस निवडून आलेल्या सर्व सरपंच उपसरपंच सदस्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले व आमच्या हातून या गावाचा नक्कीच विकास करून परिवर्तन पॅनलचं नाव आहे त्याप्रमाणे गावाचा परिवर्तन करू असा शब्द आम्ही तुम्हाला देत आहोत आणि तो आम्ही पूर्ण करू अशाप्रकारे गावकऱ्यांना आश्वासन दिले यावेळेस गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते