महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा ——–
प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की, दिनांक ६ डिसेंबर रोजी माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव विद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आला.
प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु.पायल शिरसाठ (इ.१०वी)ही विद्यार्थिनी होती.शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व आपल्या देशासाठी दिलेले योगदान सांगितले. इ.८वी. कु.ललित गांगुर्डे,कुमारी प्रणिती साप्ते, कु. प्राची देवरे व इतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापिका. श्रीमती मढवई मॅडम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सांगितले.श्री.गलांडे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.श्री केदारे सर,श्री.गांगुर्डे सर,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री,दिवटे सर ,श्री कदम सर श्री देवडे सर
व सर्व विद्यार्थी व पालक कार्यक्रमास उपस्थित होते.