ताज्या घडामोडी

जागतिक दिव्यांग दिन लासलगाव ग्रामपंचायत मध्ये उत्साहात साजरा

प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर.

मंगळवार दिनांक 6 डिसेंबर रोजी लासलगाव ग्रामपंचायत येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला . इ. स.१९९२ पासून ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन संयुक्त राष्ट्र संघातर्फे जाहीर करण्यात आला. दिव्यांग व्यक्ती ही कोणाला ओझे न ठरता ती स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हावी. तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी जागतिक स्तरावरील आरोग्य संघटना प्रयत्नशील व कार्यप्रणव राहावी म्हणून तिला हा प्रेरणादायी दिवस ठरवून देण्यात आला आहे. याप्रसंगी मा. सभापती तथा संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावच्या सौ. सुवर्णाताई जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त करताना समाजात वावरताना लोक दिव्यांग बांधवांना मदत करत नाहीत त्यांना अपमानास्पद वागणूक देतात शरीर अपंग बरोबरच अशा व्यवहार आणि मानसिक अपंगत्व पण येते त्यामुळे त्यांची परवडत थांबवली पाहिजे काही व्यक्ती जन्मता शारीरिक दिव्यांग असतात तर काही अपघाताने दिव्यांग झालेले असतात ते काहीही असले तरी त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही म्हणून शासनासह समाजाने सुद्धा त्यांच्याबद्दलचे आपले कर्तव्य बजावली पाहिजे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने जीवन जगण्याचा अधिकार बळ व नवी उमेद अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेल्या ४ ते ५ महिन्यापासून भुसावळ डिव्हिजनला पडून असलेले दिव्यांग सवलत पास सौ. सुवर्णाताई जगताप यांनी.

पाठपुरावा करून मागून घेतले व या प्रसंगी रेल्वे कन्सेशन पास तसेच अंत्योदय शिधा कार्डचे परिसरातील दिव्यांग लोकांना वाटप करण्यात आले. दोन महिन्यापूर्वी लासलगाव येथील दिव्यांग बांधव श्री अविनाश देसाई यांचे कोटमगाव रोडवरील सलून चे दुकान जळून खाक झाले .त्यांचे शंभर टक्के नुकसान झाले होते ते त्या व्यवसायावर उपजीविका करत होते. अशा प्रसंगात सौ सुवर्णाताई जगताप यांनी व परिसरातील दिव्यांग बांधव यांनी आर्थिक मदत केली. या कार्यक्रम प्रसंगी लासलगाव ग्रामपंचायत उपसरपंच रामनाथ शेजवळ टाकळीच्या सरपंच सौ. अश्विनी जाधव ग्रामपंचायत सदस्य सौ .ज्योतीताई सुराशे सौ .ज्योती निकम राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ .प .बाळासाहेब महाराज शिरसाठ लासलगाव ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी श्री शरद पाटील प्रहार संघटनेचे लासलगाव अध्यक्ष श्री अनिल जी भावसार उपाध्यक्ष मनोज परेराव सचिव राजू सुरसे खजिनदार सागर धुमाळ संपर्कप्रमुख भूपेंद्र जैन कोटमगाव प्रहार संघटना अध्यक्ष श्री .वामन भवर लासलगाव परिसरातील दिव्यांग बांधव संघटनेची सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.