श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी देवी संस्थाने नेमलेल्या सुहाना जाहिरात मसाल्याचा भोंगळ…
संपादक सोमनाथ मानकर

साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी देवी संस्थान ते मुंबादेवी चौक व तलाव परिसरामध्ये सुहाना मसाले यांची जाहिरात लावलेली आहे तसेच शिवालय तलावाच्या पार्किंग या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना राहण्याची व्यवस्था देवी संस्थानच्या वतीने करण्यात आलेली असून या ठिकाणी सुद्धा सुहाना मसाल्याची जाहिरात केली आहे यामुळे या परिसराला शोभा निर्माण झाली आहे परंतु जे बॅनर उभे करण्यासाठी साहित्य वापरले त्या साहित्याला खूप कमी प्रमाणात आधार दिल्यामुळे केव्हाही जमिनी वरती पडतात त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो याकडे सुहाना मसाला कंपनी व देवी संस्थान यांनी लक्ष द्यावे अशी भूमिका आता गावातील ग्रामस्थ व भाविक करत आहे
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू असून लाखोच्या संख्येने रोज भाविक शिवालय तलाव परिसरामध्ये स्नान करण्यासाठी येत असतात याच रस्त्याला लावलेले सुहाना कंपनीचे जाहिरातीचे बॅनर व्यवस्थित न लावल्याने आठ ते दहा बॅनर जमिनीवर पडले या बॅनरखाली छोटेसे फुलाचे स्टॉल लावलेल्या चार ते पाच महिला थोडक्यात बचवल्या तसेच या ठिकाणी भाविक सुद्धा जात होते परंतु ते जोरात एक बाजुला सरकल्यामुळे सदर भाविक सुद्धा बचावले
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व सुहाना मसाला कंपनीने गडावरती जाहिरातीचे बॅनर लावलेले आहे ते लावताना व्यवस्थित आहे का नाही हे बघण्याचे काम कोणाचे? देवी संस्थान की सुहाना कंपनी हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे भाविकांची वर्दळ कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना नाही घडली परंतु उद्या याची जबाबदारी घेणार कोण? असा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे
कोजागिरी पौर्णिमा च्या दिवशी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येतात जर त्या दिवशी ही घटना घडली असती तर मोठा घडला असता तरी सुहाना कंपनी जाहिरातदार व देवी संस्थान यांनी सावध होऊन योग्य पाऊल उचलावे अशी अपेक्षा गडावरील ग्रामस्थ व भाविक करतं आहे
सदर आठ ते दहा बॅनर खाली पडल्या नतर पोलीस कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी देवी संस्थान सुरक्षारक्षक भाविकांनी सदर बॅनर उचलण्याचे प्रयत्न केला परंतु जास्त प्रमाणात वजन असल्यामुळे ते उचलता नाही आले त्यानंतर ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्यांनी येऊन एक एक बॅनर मोकळा करून रस्त्यातून अडथळा बाजुला केला.
सुहाना कंपनी जाहिराती मधुन लाखों रुपये कमवनार आहे पन या बॅनरचा फायदा देवी संस्थानला किती व कसा यांची माहिती मिळाली नाही जाहिरातीच्या नावाखाली कुठेतरी पैसा अडकाउन खरंच भाविकांना याचा फायदा होणार आहे का असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित होत आहे