ताज्या घडामोडी

लासलगाव महाविद्यालयात ‘विज्ञान मंडळाचे उद्घाटन’ आणि ‘डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती’ साजरी

मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव, ता. १४  : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विज्ञान विभाग, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना + २ स्तर विभाग यांच्या वतीने दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतरत्न डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले तसेच या प्रसंगी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन देखील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले. तसेच विज्ञान मंडळाचे उद्घाटन देखील याप्रसंगी संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, प्रमुख वक्ते डॉ.चारुदत्त अहिरे आणि विष्णू थोरे सर, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक उज्वल शेलार, ग्रंथपाल प्रा.गुरुदेव गांगुर्डे, रासेयो +२ स्तर कार्यक्रमाधिकारी देवेंद्र भांडे सर आणि सुनिल गायकर सर इ. उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा.गुरुदेव गांगुर्डे आणि विज्ञान शाखेचे डॉ.विलास बनकर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.चारुदत्त अहिरे यांनी किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये संप्रेरकांमुळे होणारा बदल या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुप्रसिद्ध कवी, चित्रकार, लेखक तथा उत्तम वाचक श्री.विष्णू थोरे सर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाचन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करताना वाचनाचे महत्त्व पटवून देत विविध कवितांचे देखील सादरीकरण केले. ते म्हणाले की मी याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून याच महाविद्यालयात माझ्यावर वाचन व लेखनाचे संस्कार होऊन मी लेखक व कवी झालो. विद्यार्थ्यांनी वाचन करून पुस्तकांची मैत्री करावी असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी, वाचन वेडे व्हावे तसेच विज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी व्हावे असा संदेश देत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी सुनिल गायकर सर यांनी केले. तर आभार गणेश जाधव सर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी विज्ञान शाखेचे विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.विलास बनकर, ग्रंथपाल प्रा.गुरुदेव गांगुर्डे आणि रासेयो कार्यक्रमाधिकारी देवेंद्र भांडे सर आणि सुनील गायकर सर यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.