
हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये देवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी देवीचे सातवे रूप कालरात्रीची पूजा केली जाते. २१ ऑक्टोबर २०२३, शनिवारी, देवी दुर्गेच्या सातव्या रूपाची विधिवत पूजा केली जाते. देवी कालरात्रीचे शरीर अंधारासारखे काळे आहे. आईचे केस लांब आणि विखुरलेले आहेत. आईच्या गळ्यात माळ आहे, जी विजेसारखी चमकत राहते. देवी कालरात्रीला चार हात आहेत. आईच्या हातात खड्ग, शस्त्र, वरमुद्रा आणि अभय मुद्रा आहे.
आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी हजारो भाविकांनी भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेतले. यावेळी श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ऍड श्री दिपक पाटोदकर व महापूजेचे दुसरे मानकरी आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महापूजा केली, आरती प्रसंगी पाटोदकर व पाटील कुटुंबीयांनी उपस्थित राहून श्री भगवतीचे दर्शन घेतले.
सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. यावेळी देवीचे रूप अधिकच खुलून दिसत होतं प्रसंगी नाशिक जिल्हा पालक मंत्री श्री दादा भुसे यांनी श्री भगवतीचे दर्शन घेतले व संकल्प आरती यावेळेस केली.
महाराष्ट्रासह विविध राज्यातील आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे ३० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरती भाविकांना आई भगवतीचे सुरळीत दर्शन व्हावे याकरता शिवालय तलाव व पहिली पायरी या ठिकाणी सुहाना मसाला यांच्यातर्फे येणाऱ्या भाविकांना आई भगवतीचे सुरळीत दर्शन व्हावे याकरता दोन मोठ्या एलईडी स्क्रीन लावलेल्या आहे यामुळे भाविकांना गर्दीमध्ये सुद्धा आहे भगवतीचे दर्शनी व्यवस्थित होते
शिवालय तलाव परिसरात येणाऱ्या भाविकांना राहण्याची सोय ह्यावी या करता निवारा शेड बनवण्यात आले आहे